राजकीय
राजकीय

कॉकरोच जनता नंतर आता E20 जनता पार्टी

दिल्ली, दि. 27 : कॉकरोच जनता पार्टीनंतर आता सोशल मीडियावर आणखी एका नव्या पार्टीची एन्ट्री झाली आहे. E20 जनता पार्टी असं या पार्टीचे नाव आहे.E20 जनता पार्टी ही कोणतीही नोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा अधिकृत संघटना नाही. हा सोशल मीडियावर सुरू झालेला एक डिजिटल ट्रेंड आहे.

अभियानामागील लोकांचे म्हणणे आहे की, केंद्र सरकार E20 पेट्रोलला प्रोत्साहन देत असेल तर त्यास हरकत नाही; मात्र ग्राहकांना 100 टक्के शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा पर्यायही पेट्रोल पंपांवर उपलब्ध असावा. कोणते इंधन वापरायचे, याचा निर्णय ग्राहकांनी स्वतः घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे.

E20 जनता पार्टीच्या सोशल मीडिया हँडलला मोठा प्रतिसाद मिळत आहे. कालपर्यंत ‘X’ वरील या हँडलचे सुमारे 13 हजार फॉलोअर्स होते.ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि भारताच्या E20 धोरणावर खुली व निष्पक्ष सार्वजनिक चर्चा घडवून आणणे, हाच या अभियानाचा उद्देश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts