
दिल्ली, दि. 25 : गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील जंतर-मंतरसह देशातील विविध भागांत विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत होते. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामागे नेमके कारण काय, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी त्यांच्या दिल्लीवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुढील केंद्रीय शिक्षणमंत्री कोण असणार, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
काही नेत्यांकडून फडणवीस यांच्या नावाची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.NEET प्रकरणामुळे सुरू झालेल्या आंदोलनानंतर आता केंद्र सरकारकडून पुढील कोणते निर्णय घेतले जातात आणि शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाते, याकडे विद्यार्थ्यांसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.












