
मुंबई, दि. 1: इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने मोठी वाढ होत होती. होर्मुज खाडी युद्धाचे मैदान झाली होती. ज्यामुळे जागतिक बाजारात एलपीजीचे भाव गगणाला पोहोचले होते. व्यावासायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये तर कमालीची वाढ सरकारने केली होती .मात्र आता सरकारकडून नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला.
1 ऑगस्टपासून एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 192 ची कपात करण्यात आली. आता 192 रूपयांनी गॅस स्वस्त मिळेल. मात्र, 14.2 गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा धक्का देण्यात आला. 300 रूपयांनी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही.
देशात एलपीजी गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. आता व्यावसायिक गॅस सिलेंडरधारकांना अखेर थोडा दिलासा देण्यात आला. आता सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या दराबद्दल मोठी घोषणा करू शकते.












