
अरे सरकारी मालमत्ता आहे. काहीही करा चालतंय. ही मानसिकताच देशाच्या विकासाला खिळ घालतेय. याच धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. रेल्वेच्या वातानुकूलित कोचमधून तब्बल १.२७ कोटी वस्तू प्रवाशांनी लंपास केल्याची भयानक वास्तव समोर आलं आहे.
भारतीय रेल्वेतून चोरीच्या घटना देशाला नवीन नाहीत. भारतीय रेल्वेच्या मालकीच्या अनेक वस्तू दिवसा-ढवळ्या चोरल्या जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. रेल्वेच्या वातानुकूलित कोचमधील बेडशिट, टॉवेल, बेडरोल आदी वस्तू प्रवाशांच्या सोयी-सुविधेसाठी दिल्या जातात. परंतु, सर्रासपणे अगदी या वस्तूंची चोरी होत असल्याचे आढळून येते.
इंडियन एक्सप्रेस ने आरटीआयच्या माध्यमातून मागवण्यात आलेल्या माहितीतून जानेवारी २०२२ ते मे २०२६ या कालावधीत किमान १.२७ कोटी बेडरोल चोरीला गेले आहेत . आकडेवारीनुसार, २०२२ ते २०२५ दरम्यान चोरीच्या घटनांमध्ये ५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, देशातील सात रेल्वे झोनमधील १० रेल्वे विभागांमध्ये बेडरोल चोरीच्या सर्वाधिक घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या विभागांमध्ये राजस्थानमधील बिकानेर, जोधपूर आणि जयपूर, रांची, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, सोनपूर आणि दानापूर, बिलासपूर यांच कोचं समावेश आहे.
एकूण चोऱ्यांपैकी सुमारे ६७ टक्के चोऱ्या या १० विभागांमध्ये होतात.कोच अटेंडंट सांगतात की, अनेक प्रकरणांमध्ये चोरी झालेल्या लिनेनची किंमत त्यांच्या पगारातून वसूल केली जाते. त्यामुळे नाहक अटेंडंट यांना त्रास सहन करावा लागतो.सरकारी मालमत्तेचे नुकसान करने म्हणजे संपूर्ण देशाचे नुकसान करणं आहे.त्यामुळे सुविधा टिकवायच्या असतील, तर मानसिकता बदलणे हीच सर्वात मोठी सुधारणा आहे.”












