
पॉपचा बादशाह मायकल जॅक्सनची जादू अजूनही कायम आहे.सध्या जागतिक बॉक्स ऑफिसवर मायकल च्या बायोपीकचा जलवा सुरु आहे.मायकल चित्रपट प्रदर्शीत झाल्यापासून काही महिन्यातच या चित्रपटाने 1 अब्ज डॉलरहून अधिक कमाई करत आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा बायोपिक ठरण्याचा विक्रम केला आहे.
या चित्रपटात मायकेल जॅक्सन यांची भूमिका त्यांच्या पुतण्या जाफार जॅक्सन यांनी साकारली असून, त्यांच्या अभिनयाचं जगभरात कौतुक होत आहे.समीक्षकांकडून चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मात्र,प्रेक्षकांनी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि ९७ टक्के सकारात्मक प्रतिसाद दिला. याच जोरावर चित्रपटाची कमाई सातत्याने वाढत राहिली.
या चित्रपटाने तर २१७ दशलक्ष डॉलरच्या ओपनिंग विकेंडसह संगीतप्रधान बायोपिकमधील सर्वात मोठी सुरुवात करण्याचाही विक्रम या चित्रपटाने आपल्या नावावर केला आहे.पॉपचा बादशाह आज आपल्यात नसला, तरी त्याचं संगीत आणि त्याचा वारसा आजही जगभरातील चाहत्यांच्या मनावर तितक्याच ताकदीने अधिराज्य गाजवत आहे हेच खरं.












