पुणे

पाथरगाव जुना दगडी इंद्रायणी नदी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने

पुणे, दि.७ : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील पाथरगाव जुना दगडी इंद्रायणी नदी पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुक बंद करुन पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत.त्याअन्वये पुण्याकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सुरु होताना कि.मी. ९४ येथून वळविण्यात आली आहेत. सोमाटणे फाटा येथून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तर वडगाव तळेगाव फाटा येथून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वळविण्यात येणार आहेत.

तसेच मुंबईकडून पुणेकडे जाणारी अवजड वाहने खंडाळा एक्झीट येथून जुन्या हायवे वर येऊ न देता यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने , लोणावळा-कुसगाव टोलनाका किमी ५५ येथून यशवंतराव मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वळविण्यात येत आहे.

नवीन पुलावरुन दुचाकी, तीनचाकी, हलकी चारचाकी वाहने वळविण्यात येत असून मुंबई व पुणे या दोन्ही दिशांकडून येणारी अवजड मालवाहू वाहने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन वळविण्यात येत आहेत, असेही कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts