शिक्षण

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २८ जुलैपर्यंत अर्ज करावे

पुणे, दि. १६ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमात ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना ही प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती दिली जाते.

इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह २८ जुलै २०२६ पर्यंत जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, येरवडा, पुणे येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts