शिक्षण

MHT-CET मध्येही घोटाळा? विरोधकांकडून चौकशीची मागणी

मुंबई, दि. 28 : आता राज्यात NEET पेक्षाही MHT-CET मध्येही घोटाळा झाल्याचे आरोप विरोधक करत आहेत.राष्ट्रवादीचे महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया एक्स हँडलवरून शेअर केला आहे. त्यात एका शिक्षकाने एमएच-सीईटी 2026 मध्ये कसा महाघोटाळा झाला याविषयी भाष्य केले आहे. हा व्हिडिओ समोर आणत बालगुडे यांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे.

तसेच,काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी MH-CET परीक्षेत महाघोटाळ्याचा आरोप केला. ज्या विद्यार्थ्यांना बारावीला जेमतेम 35-40 टक्के गुण मिळाले. त्यांना एमएच-सीईटी परीक्षेत 90-100 पर्सेंटाईल्स कसे पडले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली. त्यांनी या परीक्षेच्या निकालाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्यापाठोपाठ आमदार रोहित पवार यांनीही या परीक्षेतील घोटाळ्यावरून सरकारवर निशाणा साधला.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts