
पुणे, दि 16 : सातबऱ्यातील कथित गैरव्यवहार प्रकरणी महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम १५५ चा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचा ठपका ठेवत १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
तहसीलदारांना सातबारा उताऱ्यातील लेखनदोष दुरुस्त करण्यासाठी कलम १५५ अंतर्गत अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, या अधिकारांचा वापर करताना काही अधिकाऱ्यांनी नियमबाह्य आदेश दिल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने मागील पाच वर्षांतील आदेशांची छाननी करून शासनाला अहवाल सादर केला.
या अहवालात १३ गंभीर प्रकरणांमध्ये १५ अधिकारी व कर्मचारी जबाबदार आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.












