
कानपुर, दि. 20 : अंगावर टॅटू काढताय तर सावधन कारण कानपुरच्या एका महिलेला टॅटू काढणं चांगलंच महागत पडलं आहे. कानपुरची एक 32 वर्षीय महिला दिल्लीला फिरायला गेली. तिथे तिने टॅटू काढला. काही दिवसांनी ती कानपुरला परतली. तिला टॅटू काढला त्या ठिकाणी त्रास सुरु झाला. सुरवातीला घरगुती उपाय केले. फरक पडला नाही.
डॉक्टरांनी जननेंद्रियामध्ये गंभीर संसर्ग झाल्याचे सांगितले. मात्र त्रास वाढतच चालला.शेवटी तिने गणेश शंकर विद्यार्थी मेमोरियल (GSVM) मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन तपासणी केली, तिथे रक्ताच्या चाचणीत तिला HIV पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.डॉक्टरांच्या मते, टॅटू बनवताना वापरलेली निष्काळजीपणा आणि दूषित सुई हेच या संसर्गाचे मुख्य कारण आहे. त्यामुळे टॅटू काढतांना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
टॅटू काढल्यानंतर त्वचा पूर्णपणे बरी होण्यासाठी साधारण २ ते ३ आठवडे लागतात. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा.टॅटू काढताना नेहमी नवीन आणि निर्जंतुक सुई वापरली जात आहे याची खात्री करा. टॅटूपूर्वी २४ तास मद्यपान टाळा आणि पोटभर जेवण करून जा.
टॅटूनंतर आर्टिस्टने लावलेली पट्टी २ ते ३ तास काढू नका. दिवसातून दोनदा कोमट पाण्याने आणि सौम्य साबणाने टॅटू स्वच्छ धुवा. सुगंध नसलेले मॉइश्चरायझर लावा आणि सैल सुती कपडे वापरा.सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॅटूला खाजवू नका, तो पूर्ण बरा होईपर्यंत पोहणे टाळा आणि थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा.