
नवी दिल्ली, दि. 25 : देशातील विविध प्रश्नांवरून तरुणांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेन-झी अर्थात तरुण पिढीच्या भूमिकेवर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
जेन-झी पिढीने सरकारला विविध मुद्द्यांवर जाब विचारत आंदोलनांच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद केला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी तरुणांच्या आक्रमक भूमिकेचे भाष्य करताना, “जेन-झीने सरकारच्या झिंज्या उपटल्या”, अशी मिश्कील पण खोचक प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांच्या या एका वाक्यातील प्रतिक्रियेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, तरुणांच्या वाढत्या राजकीय सहभागाकडेही यामुळे लक्ष वेधले गेले आहे.












