देश विदेशराजकीय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला

दिल्ली, दि. 25 : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दिल्लीतील या आंदोलनाचे लोण मुंबई, राजस्थान, बिहार, गुवाहाटी अशा सर्वच राज्यांमध्ये पसरले होते. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढून केंद्र सरकाविरोधात असंतोष वाढत चालला होता. त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करत होते. आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.तसेच,दिल्लीच्या जंतरमंतर परिसरात पुन्हा गोंधळाचं वातावरण असून विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज झाल्याची माहिती मिळत आहे.

तसेच जंतरमंतर परिसरामध्ये दगडफेक झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. संसद भवनाकडे जाणाऱ्या टॉलस्टॉय मार्गावर हा गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts