
दिल्ली, दि. 30 : कंगना राणावतने नुकतचं जेन झी आंदोलकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर कंगनाच्या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या.कंगनाच्या टिकेला कॉकरोच जनता पार्टीचा प्रवक्ता सौरव दास याने उत्तर दिल आहे.माझे मित्र मला बोलतात की, मी तरुणपणीच्या हृतिक रोशन सारखा दिसतो, म्हणून कंगना माझ्या मागे लागली आहे’ असं सौरव दास म्हणाला. सौरव दासने असं बोलून कंगना राणौतवर व्यक्तीगत हल्लाबोल केला आहे.
तसेच, कंगना मला हताशा दिसते. मानसिक दृष्टया स्थिर नसलेली व्यक्त अशा प्रकारे बोलते” असं सौरव दासने टीका करताना म्हटलं आहे. पत्रकार बरखा दत्ता यांच्या ‘द मोजो स्टोरी’मध्ये बोलताना सौरव दास म्हणाला की, “माझ्या मनात कंगना राणौत बद्दल कुठलीही व्यक्तीगत द्वेषाची भावना नाहीय, उलट कंगनानेच हा वाद व्यक्तीगत पातळीवर नेला” “हे बघा, माझ्या मनात कंगनाबद्दल कुठलाही व्यक्तीगत राग नाहीय. तिने जेन झी बद्दल पर्सनल शेरेबाजी केली आणि आता माझ्यावर बोलत आहेत. मी माझ्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे” असं सौरव म्हणाला.












