पुणेराजकीय

पुण्यात अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे पदाधिकारी ताब्यात

पुणे, दि. 1 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावरती आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णा भाऊ साठे स्मारकाला अभिवादन करणार आहेत.दरम्यान विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केले जाणार आहे. शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख, राजू ठोंबरे अशी त्यांची नावं आहेत.

काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.दरम्यान शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अटक केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमधून एक व्हिडिओ केला आहे. त्यात ते म्हणताईत नमस्कार, रात्रीचे ११:४५ झालेत. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रात्री १२ वाजता घरातून डिटेन केलं आहे. त्याचं कारण काय? तर उद्या अमित शाह, देशाचे गृहमंत्री पुण्यात येत आहेत आणि त्यासंदर्भात आम्हाला रीतसर पुणे पोलिसांनी परवानगी देऊन सुद्धा सकाळी साडेदहा वाजता प्रत्यक्ष आमचं आंदोलन होणार होतं. परंतु युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी कसलीही नोटीस न देता ताब्यात घेतलेलं आहे.

आता याच्यात पोलिसांची काहीच चूक नाही. परंतु सरकारचा दबाव इतका आहे की पोलिसांवर सुद्धा त्यांच्यावर दबाव आहे. रात्री १२ वाजता स्वतःही त्यांना झोपू देत नाही आणि आम्हालाही झोपू देत नाही आणि घरातून उचलून इथं आणलेलं आहे. आम्ही सरकारचा निषेध करतो… धिक्कार करतो…आणि आता उद्यापर्यंत आम्हा सर्वांना डिटेन करतील, काय करतील… कारण आमचं आंदोलन उद्या सकाळी…हे सगळे… एकेकाच्या घरातून आम्हाला डिटेन करण्यात आलेलं आहे. धन्यवाद.”

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts