राजकीय
राजकीय

मोदीजी इन्स्टाग्रामच्या रिलवर तरुणांना माफ करताईत पण त्यांचे पोलीस…..

औरंगाबाद, दि. 2 : सीजेपीचे आंदोलन संपल्यानंर आता पोलीस काही ठिकाणी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करत आहेत. यावर दीपके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दिपके म्हणाले मोदीजी इन्स्टाग्रामच्या रिलवर तरुणांना माफ करत आहेत. पण त्यांचे पोलीस केसेस दाखल करत आहेत. मोदी इन्स्टाग्रामवर वेगळं बोलत आहेत. जमीनीवर वेगळी स्थिती आहे. तुम्हाला माफ करायचं असेल तर केसेस मागे घ्या, असे आवाहनही त्यांनी मोदी सरकारला केले.

तसेच,आंदोलनात जर गुन्हेगार असतील तर त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत. परंतु विद्यार्थ्यांवर अन्याय करू नये. त्यांचे करिअर उद्ध्वस्त करू नये, अशी भूमिका दीपके यांनी घेतली आहे.

२०२१ चे गुन्हेगार आमच्या आंदोलनात फिरत होते असा आकडा आहे. २०२०-२०२१ चे गुन्हेगार मोकळे कसे फिरत होते. पोलीस काय करत होते. पोलीस त्या गुन्हेगारांना फिरू देत होते. पोलिसांच्या परवानगी शिवाय ते फिरत नसतील. मला जंतरमंतवर चेकिंग करूनच सोडत होते. आंदोलन आयोजित करणाऱ्या दीपकेला चेकिंगशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. मग इतर गुन्हेगार आत आलेच कसे, असा संतप्त सवालही दीपके यांनीक केला.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts