टेक

इंटरनेट नसतानाही होणार UPI पेमेंट!

पुणे, दि. 23 : तुम्ही कुठेतरी फिरायला गेलाय. तुम्ही शॉपिंग केली आहे. आणि तुम्हाला आता ऑनलाईन पेमेंट करायच आहे. मात्र इंटरनेट नाही आता आशावेळी काय करायच? असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल मात्र आता इंटरनेट नसतानाही upi पेमेंट करता येणार आहे.NPCI ने इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्यासाठी तीन सोप्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

तुमच्या स्मार्टफोनमध्ये NFC फीचर असेल, तर इंटरनेट सुरू असताना UPI Lite X मध्ये पैसे लोड करून नंतर इंटरनेटशिवाय फक्त फोन टॅप करून पेमेंट करता येते. एका व्यवहारात ₹500 आणि एकूण ₹2,000 पर्यंत व्यवहार करता येतात.

दुसरी पद्धत म्हणजे USSD सेवा (*99#). तुमच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरून *99# डायल करा आणि स्क्रीनवरील पर्याय वापरून पैसे पाठवा, बॅलन्स तपासा किंवा UPI PIN बदला. या सुविधेत एका व्यवहारात ₹5,000 पर्यंत पैसे पाठवता येतात.

तिसरी सुविधा म्हणजे IVR आधारित UPI पेमेंट. 080 4516 3666 किंवा 6366 200 200 या नंबरवर कॉल करून व्हॉइस सूचनांनुसार इंटरनेटशिवाय UPI व्यवहार करता येतो. या माध्यमातून एका व्यवहारात ₹10,000 पर्यंत पैसे ट्रान्सफर करता येतात.त्यामुळे आता इंटरनेट नसलं तरी आर्थिक व्यवहार करणं थांबणार नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts