
सरसा, दि. 3 : बिहारमध्ये पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ट्रेनमधील काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उड्या मारल्या.
प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, आधी इंजिनला आग लागली. त्यानतंर काही वेळात या आगीने रौद्ररूप धारण केलं. या ट्रेनमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांनी तातडीने ट्रेनमधून उतरण्यास सुरुवात केली. सर्व प्रवासी वेळेत ट्रेनमधून उतरल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणत्याही प्रकराची जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती हाती आली आहे.
ट्रेनला आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल होऊ लागले आहेत. या ट्रेनमधील प्रवाशांना रेल्वेकडून पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे.












