
मुंबई दि. 27 : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.त्यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून जातील, असा दावा संजय राऊत वारंवार करत आहेत. मात्र, फडणवीसांनी हा दावा फेटाळला आहे.
देवेंद्र फडणवीस हे मी महाराष्ट्रातच राहणार, असे सांगत असले तरी त्यांनी कुठे राहायचं, ही गोष्ट त्यांच्या हातात नाही. 2022 मध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारणं त्यांच्या हातात नव्हतं ना? जेव्हा कमिशनरचा हवालदार केला, तेव्हा मोदी-शाहांनी आदेश दिले होते. या गोष्टी त्यांच्या हातातच नाहीत. भारतीय जनता पक्षात स्वाभिमान आणि मेरिट आहे कुठे? या देशाचा शिक्षणमंत्री मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनात या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचेच नाव सुरु आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
तसेच गरिबांची मुलं संघाच बोगस शिक्षण घेत आहेत. अन नेत्यांची मुलं परदेशात शिकत आहेत.त्यांना इकडे शिकायला लावा, असे संजय राऊत यांनी म्हनाले.












