मनोरंजन

जूनच्या रिमझिम पावसासोबत प्रेमही येत? काय आहे जून थेरी

जून महिना म्हणजे थंड वारे, रिमझिम सुरु झालेली पावसाची सुरवात अल्लाहदायक वातावरण. हातात चहा कप आणि सोबतीला आवडती व्यक्ती. किती छान वाटतं ना अनुभवायला या गोष्टी . अश्याच काही अनुभवातून निर्माण झालाय एक ट्रेंड “जून थेरी”. पण हा ट्रेंड तुम्हाला माहिती आहे का?

जून थेरी या ट्रेंड नुसार हा महिना फक्त पावसाचाच नाही तर काहींच्या आयुष्यात प्रेम नवे बदल नवी चाहूल घेऊन येणारा महिना आहे.काहींना याच काळात त्यांचा जोडीदार भेटतो, तर काहींच्या आयुष्यात नवी प्रेमकथा सुरू होते.मात्र या जून थेरीला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. जून थेरी हा फक्त टिकटॉक इंस्टावर वर व्हायरल झालेला एक सोशल मीडिया ट्रेंड आहे.

आता तुम्ही म्हणाला या ट्रेंडला कोणताही वैज्ञानिक आधार नाही तर हा ट्रेंड एवढा व्हायरल का होतोय? तर, झालंय असं लोकांना त्यांच्या आयुष्यातील घटनांशी हा ट्रेंड जोडून पाहायला आवडतो. त्यामुळे अल्गोरिदम अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ सातत्याने दाखवू लागतो .

जून थेरी सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा ट्रेंड फक्त मनोरंजन आणि वैयक्तिक अनुभवनावर अवलंबून आहे हेच खरं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

1 Comment

  1. Pranjal Raipur says:

    खूप सुंदर तुमच्या लिखाणातून नवीन ट्रेड माहित पडला..

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts