
Ai चा वापर करुन अनेक लोकांच्या फोटोचा गैरवापर केला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कित्येक लोकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे Ai म्यूज इमेज या फिचर वादात सापडलं होत. अखेर मेटाने हें फिचर बंद केल.
मेटाच्या म्यूज इमेज या फिचरमुळे प्रामुख्याने गोपनीयतेच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या. हें टूल कोणाच्याही सार्वजनिक इंस्टाग्राम वरील इमेजेस घेऊन त्यातून नवीन इमेज तयार करण्याची परवानगी देत होते.
इन्स्टाग्रामवरील हे फिचर डीफॉल्ट स्वरूपात ‘ऑन’ होते, त्यामुळे नकळतपणे लोकांचे फोटो एआय निर्मितीसाठी वापरले जात होते.कोणत्याही युजरला परवानगीशिवाय किंवा पूर्वसूचना न देता एआय इमेजमध्ये टॅग केले जात होते, ज्यामुळे अनोळखी लोक दुसऱ्याचे फोटो मॉर्फ किंवा क्लोन करू शकत होते.
या तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात आक्षेपाहार्य प्रतिमा बनवल्या जात होत्या.वापरकर्त्यांचा वाढता विरोध पाहता मेटाला हे वादग्रस्त फिचर काही दिवसांतच बंद करावे लागले.
आता जर तुम्ही Meta AI मध्ये जाऊन कोणाचाही इन्स्टाग्राम अकाउंट टॅग करून त्याचा एआय फोटो तयार करण्याचा प्रयत्न केला, तर एआय चॅटबॉट त्याला स्पष्ट नकार देतो.याशिवाय, पब्लिक इन्स्टाग्राम अकाउंटवरील “Allow people to reuse your content…” हा पर्यायही मेटाने हटवला आहे.












