राजकीय
राजकीयशिक्षण

MPSC पेपर फुटी प्रकरणात रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. रोहित पवार यांनी त्यांच्याकडे पुरावे असल्याचा सुद्धा दावा केला आहे. रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. एक प्रेझेंटेशन करुन त्यांनी हा पेपर कसा फुटला ते सर्व समाजवून सांगितलं.

“पैसे देऊन एखादा पेपर विकत घेऊन एखादा औषध निरीक्षक झाला असेल तर तो प्रामाणिक काम करेल का ? तो पैसे वसूल करण्याचं टारगेट पहिल ठेवेलं. एका कफ सिरफने २२ मूल मेली होती त्याची तपासणीची जबाबदारी औषध निरीक्षकावर असते” असं रोहित पवार म्हणाले.

“नंदूरबारच्या कौटिल्य अकादमीतील एका विद्यार्थ्यांना 90 टक्के प्रश्न आधीच मिळाले होते. पैसे मिळाल्यावर तो माणूस व्हॉट्स अपवर प्रश्न पाठवायचा. दोन ते तीन मिनिटांनी डिलिट फॉर ऑल करायचा. ते डाऊनलोड केलेले प्रश्न एकाने आपल्या मित्राला पाठवले. त्यामुळे त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत” असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts