
मुंबई, दि. 2 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत.पक्षाच्या युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या जागी पक्षाच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.त्यानुसार विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुशील बेर्डे यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या आहेत.
पक्षाचे युवक अध्यक्षपद शहर आणि ग्रामीण अशा दोन भागात विभागून देण्यात आले आहेत. युवकच्या शहरसाठीच्या प्रदेशाध्यक्ष पदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र युवती अध्यक्ष पद देताना देखील बदल करत शहर आणि ग्रामीणसाठी अध्यक्ष निवड करण्यात आली आहे. त्यानुसार मनाली भिलारे शहरच्या युवती प्रादेशाध्यक्षा तर अमृता कालदाते ग्रामीणसाठी प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.












