मनोरंजन

विजय यांच्या पत्नी संगीता यांची घटस्फोटाची याचिका मागे; न्यायालयात प्रकरण बंद

मुंबई, दि. 7 : तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या पत्नी संगीता यांनी दाखल केलेली घटस्फोटाची याचिका अखेर मागे घेतली आहे. ७ ऑगस्ट २०२६ रोजी चेंगलपट्टू जिल्हा कुटुंब न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान संगीता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजेरी लावली.या वेळी हा खटला पुढे चालवण्याची आपली इच्छा नसल्याचे त्यांनी न्यायालयाला स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने याचिका मागे घेतल्याची नोंद करत प्रकरण बंद केले.

फेब्रुवारी २०२६ मध्ये संगीता यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणामुळे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी चर्चा रंगली होती. मात्र, आता याचिका अधिकृतपणे मागे घेतल्याने या प्रकरणावर कायदेशीररीत्या पडदा पडला आहे

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts