शिक्षण

डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

कोल्हापूर, दि. 4 : देशातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन झाले आहे. पाटील यांच्या निधनामुळे शिक्षण, आरोग्य, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी देशभरात शिक्षणाचा मोठा विस्तार करत वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी आणि इतर उच्च शिक्षण संस्थांची उभारणी केली. त्यांच्या नावाने पुणे, नवी मुंबई, कोल्हापूरसह विविध ठिकाणी विद्यापीठे आणि शैक्षणिक संकुले कार्यरत आहेत.

शिक्षणासोबतच आरोग्य सेवा आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले.ते बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय सन्मानांनी गौरविण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts